दिल्ली मधील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आपल्या आठवणीतुन जात नाही तोच तसाच सारखा प्रकार काल मुंबई मधील मिरा रोड इथे उघडकीस आला; एका ३६ वर्षीय प्रेयसी सोबत लिव्हींग रिलेशनशीप मध्ये राहणार्या एका ५६ वर्षीय मनोज शहाणे नावाच्या प्रियकराने तिचा अतिशय क्रुरपणे हत्या करत तिच्या शरीराचे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी पकडला गेला.
वरील बातमी सांगायला मी काही पत्रकार नाही; सांगण्याच कारण की आपण हिंदु-मुस्लीम; हिंदु-मुस्लीम करण्यात एवढं गुंतलोय की आरोपी मुस्लमानाचा असल्याशिवाय आपण तो गुन्हा आहे; तो एक अत्याचार आहे हे मानायलाच तयार नाही आहोत.
काही दिवसांपुर्वी दिल्लीमध्येच एका मुस्लमानाच्या निर्दयी तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर चाकुने ४० वार करुन तिचा खुन केला गुन्हा एवढा गंभीर होता की आरोपीला भर चौकात फाशी दिली तरी ती कमीच पडावी.
पण त्याच दिवशी नाशिक मध्ये एका तरुणाने भर दिवसा एका मुलीच अपहरण केलं आणि तिच्या आई-वडिलांनी त्याच दिवशी मुलीच अपहरण झाल्याच पाहुन आत्महत्या केली; केलेला गुन्हा सारखा जरी नसला तरी त्यातील क्रुरता, विक्षीप्तपणा हा तेवढाच सारखा होता मात्र त्या घटनेची चर्चा काही जास्त झाली नाही कारण काय तर आरोपी मुस्लनाचा नव्हता..
मला काही मुस्लमानाचा पुळका आहे असा काही विषय नाही; मी काही हिंदु विरोधी आहे असाही काही विषय नाही; पण आज काल झालंय काय की आपण गुन्हा कोणी केलाय त्यावर ठरवायला लागलोय की गुन्हा आहे की नाही.
दिल्लीतील हत्या प्रकरणात आजुबाजुचे चार लोक घटना वाचवु शकले असते तर आज लाखोंनी मोर्चे काढायची गरज नसती पडली; गुन्हा करणार्यांपेक्षा गुन्हा होऊ देणारेही तेवढेच हरामखोर आणि विक्षीप्त आहेत.
आजकाल जमिनीच्या एका तुकड्यासाठी सख्खे भाऊ पक्के वैरी झालेले असताना हिंदु-मुस्लीम भाई-भाई म्हणंन पण मुर्खपणाच आहे.
शेवटी काय तर गुन्हा, क्रुरता, विक्षीप्तपणा आणि हवस ह्या गोष्टींना धर्म किंवा जात नसते कारण ही लोक त्यांच्या स्वतःच्या सख्ख्यांची नसतात.